आ.प्रशांत परिचारक यांच्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड- चेअरमन अभिमान मोरे - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Sunday, 5 October 2025

आ.प्रशांत परिचारक यांच्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड- चेअरमन अभिमान मोरे

.आ.प्रशांत परिचारक यांच्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड- चेअरमन अभिमान मोरे
दुध उत्पादक शेतकऱ्यांकडून .आ.प्रशांत परिचारक यांचे आभार 

 चळे  प्रतिनिधी,,, पंढरपूर तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांसाठी पाच रुपये आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यांसाठी सात रुपये प्रतिलिटर दराने अनुदान शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली होती.
परंतू दि १/६/२०२४ ते ३१/९/२०२४ रू.5 प्रमाणे व 1/10/2024 ते 30/11/2024 असे 4 दसवडे रू.7 प्रमाणे दुध उत्पादकांचे दुध अनुदान 1 वर्षापासून प्रलंबीत होते. त्याअनुषंगाने दुध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रशांत परिचारक दूध संस्थेचे चेअरमन अभिमान मोरे यांच्यासह तालुक्यातील दूध उत्पादक शिष्टमंडळाने   वतीने.आ.प्रशांत परिचारक यांच्याकडे दुध उत्पादकांचे 1 वर्षापासून राहिलेले अनुदान मिळणेसाठी मागणी केली. 
त्यावेळी मा.आ.प्रशांत परिचारक यांनी अधिकाऱ्यांना फोन करून जिल्ह्यातील शेतकरी पाऊस व पुराने हैरान झालेला आहे. व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान लवकरात लवकर त्यांच्या खातेवर जमा करावे आशा  सूचना  वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांना दिल्यानंतर .  व दोनच दिवसात दुध उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान खात्यामध्ये  जमा केले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून . दूध संस्थेचे चेअरमन अभिमान मोरे यांच्यासह दुध उत्पादक  शेतकऱ्याकडून आ.प्रशांत परिचारक यांचे आभार मानले  आहेत.

No comments:

Post a Comment