चळे प्रतिनिधी,, ग्रामदैवत दलिंगाला साकडे घालत नारळ वाढवून तीर्थक्षेत्र विकास आघाडीने मायबाप जनतेला सोबत घेत प्रचाराचा चळे येथे दरलींग मंदिरामध्ये शुभारंभ केला. यावेळी नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता ताई भगीरथ भालके त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे गोपाळपूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ काजल विशाल मोरे व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी गोपाळपूर पंचायत समिती गण मध्ये उमेदवार दाखल केलेल्या उमेदवार,सो चंद्रभागा रामदास घाडगे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती त्यांनी त्यांचा पाठिंबा गोपाळपूर पंचायत समिती गणाच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ काजल विशाल मोरे यांना जाहीर पाठिंबा देऊन मताधिक्य देण्याचे आश्वासन दिले
यावेळी दरलींग मंदिराच्या गाभाऱ्यापासून येथून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. पदयात्रा आल्यानंतर त्या ठिकाणी सभा पार पडली.
पदयात्रेमध्ये तरुणांचा तसेच महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. मोठ्या जल्लोषात सुरू असलेल्या पदयात्रेत ठिकठिकाणी नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिताताई भालके यांचे यांचे तळी ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषांमध्ये स्वागत केले
यावेळी जेष्ठ नेते ज्ञानेश्वर गायकवाड माजी उपसरपंच भास्कर मोरे विठ्ठल दे संचालक उमेश मोरे माजी संचालक संतोष ज्ञानेश्वर गायकवाड सरपंच शालन न्यानेश्वर शिखरे मुंढेवाडी ची माजी सरपंच सिद्धेश्वर मोरे युवा नेते मधुकर मोरे डॉक्टर रामदास घाडगे माजी उपसरपंच सचिन मोरे सोसायटीचेअरमन नागा गायकवाड प्रचार प्रमुख दत्तात्रय मोरे पाटील महिला पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment