चळे प्रतिनिधी,,सध्या सोलापूर जिल्ह्यात जि.प. व पं.स. निवडणुकीचे वारे जोरदार वाहत असून पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर जि.प. गटात माजी जि.प. सदस गोपाळ अंकुशराव सरजी यांच्या पत्नी दुर्गाताई गोपाळ अंकुशराव व पुळूज पं. स. गणातून ज्योती शिवाजी पांढरे या निवडणूक लढवीत आहेत. त्यांचे सासरे लक्ष्मण पांढरे हे पुळूज गावचे माजी सरपंच आहेत. शिवाय दुर्गाताई अंकुशराव व ज्योती पांढरे या भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवीत असून त्यांना माजी आ. प्रशांत परिचारक यांची मोलाची साथ मिळत आहे. त्या परिचारक गटातून निवडणूक लढवीत आहेत. त्यामुळे जि.प. व प. समिती निवडणुकीत त्यांना नक्कीच फायदा होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
पुळूज पं.स. गणात पुळूजसह फुलचिंचोली, विटे, खरसोळी,
पुळुजवाडी, आंबेचिंचोली शंकरगाव, पोहोरगाव या गावांचा समावेश असून या गावांमध्ये बऱ्यापैकी परिचारक गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. पांडुरंग सहकारी साखर कारखाना असो किंवा युटोपियन साखर कारखाना असो पंढरपूर अर्बन बँक असो या माध्यमातून परिचारक गटाचे या भागाला कायमच सहकार्य राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या जि.प. किंवा पं.स.च्या निवडणुकीत परिचारक गटाला याचा नक्कीच फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.
या भागातील व गावागावातील कार्यकर्ते मोठ्या ताकतीने पांडुरंग परिवाराचे व भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागले आहेत. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सुद्धा या भागात दौरा आखला आहे पुळूज पं.स. गणातून एक अभ्यासू, सुशिक्षित महिला उमेदवार म्हणून ज्योती शिवाजी पांढरे यांची छाप पडत असून पं.स. निवडणुकीत त्यांचा विजयी निश्चित असल्याचे पांडुरंग परिवारातील कार्यकर्ते यांच्यातून बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment