गुरुवारी नगरसेविका माधुरीताई धोत्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Saturday, 27 December 2025

गुरुवारी नगरसेविका माधुरीताई धोत्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

गुरुवारी नगरसेविका माधुरीताई धोत्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे  उद्घाटन,संतपेठ परिसरातील लकेरी गल्ली येथे होणार सुसज्ज कार्यालय

पंढरपूर /प्रतिनिधी 

पंढरपूर नगरपालिका प्रभाग क्रमांक 17 च्या नगरसेविका माधुरीताई दिलीप धोत्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर होणार असल्याची माहिती धोत्रे यांनी दिली आहे. 
   गुरुवार दिनांक 1 जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक १७ येथील संत पेठ परिसर लकेरी गल्ली येथे  सायंकाळी ६वाजता या संपर्क कार्यालयाचा शुभारंभ होणार आहे. 
    या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके, आमदार अभिजीत पाटील, नगराध्यक्षा डॉ. प्रणिताताई भालके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, शिवसेना सोलापूर लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख महेशनाना साठे, नगरसेवक नागेशकाका भोसले, मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि विठ्ठल परिवारातील नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. तरी पंढरपूर शहरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नगरसेविका माधुरीताई दिलीप धोत्रे यांनी केले आहे

No comments:

Post a Comment