सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाची धडाकेबाज चुरस;अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार – दुर्गाताई अंकुश राव
भाजपचे ३८ सदस्य विजयी; १५ ओबीसी सदस्यांमुळे अध्यक्षपदावर लक्ष केंद्रीतसोलापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट कोणता? उत्सुकता शिगेला!
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे, अध्यक्षपदासाठी महिला सदस्याला संधी मिळण्याची शक्यता अधिक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
ओबीसी प्रवर्गातून विजयी झालेल्या सदस्यांमध्ये बालाजी नरुटे, माधवी मोरे, अमृता वाघे, दीपक वैद्य, भारती दराडे, रमेश भांजे, श्रुती भोरगुंडे, रामप्पा चिवडशेट्टी आणि चैताली मुळे यांची नावे आघाडीवर मानली जात आहेत. याशिवाय, काही नूतन सदस्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचीही चर्चा आहे.
अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले प्रमुख चेहरे म्हणजे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी, तर गोपाळपूर गटातून दुर्गाताई अंकुशराव यांचे नाव चर्चेत आहे तसेच भारती दराडे, दीपक वैद्य, वंदना कांबळे, रामप्पा चिवडशेट्टी आणि विमल खताळ. अध्यक्षपद न मिळाल्यास समित्यांच्या सभापतिपदासाठीही जोरदार फिल्डिंग सुरू असल्याचे दिसून येते.
या सर्व घडामोडींमध्ये अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असून, जिल्ह्यातील जातीय आणि राजकीय समीकरणे लक्षात घेऊनच नाव फायनल केले जाणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे प्रमुख नेत्यांची मते जाणून घेत असल्याची माहिती समोर येत आहे.
आगामी ६५८ ग्रामपंचायत निवडणुका, तसेच पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच अध्यक्षपदाचा निर्णय होणार असल्याने या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुढील आठवड्यात ग्रामविकास विभागाकडून अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारीपूर्वी अध्यक्षपदाचा फैसला होणार आहे.
सोलापूरच्या राजकारणात या निवडीमुळे कोणता नवा ट्विस्ट येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

No comments:
Post a Comment