पंढरपूरात शिवसेनेचा विराट मेळावा; भगीरथ भालके यांच्यासह शेकडोंचा पक्षप्रवेश. - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Monday, 13 April 2026

पंढरपूरात शिवसेनेचा विराट मेळावा; भगीरथ भालके यांच्यासह शेकडोंचा पक्षप्रवेश.

पंढरपूरात शिवसेनेचा विराट मेळावा; भगीरथ भालके यांच्यासह शेकडोंचा पक्षप्रवेश.April 12, 2026

पंढरपूरात शिवसेनेचा विराट मेळावा; भगीरथ भालके यांच्यासह शेकडोंचा पक्षप्रवेश.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित विराट मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके यांच्यासह त्यांच्या पत्नी व पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रणिता भालके तसेच आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

“जशी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली, तसेच भगीरथ भालके पंढरपूरात विकासाची गंगा आणतील,” असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यांच्या प्रवेशामुळे पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा परिसरात शिवसेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचे नमूद करण्यात आले. भालके यांच्या खांद्यावरचा भगवा झेंडा हा केवळ शिवसेनेचा नसून तो भागवत धर्म, प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या परंपरेचा असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

अनिल सावंत आणि तानाजी सावंत यांच्या संदर्भात बोलताना, “काका-पुतण्याचे राजकारण महाराष्ट्राने पाहिले आहे; मात्र हे दोघे शिवसेनेत एकदिलाने काम करतील,” असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी “ऑपरेशन टायगर” बाबत बोलताना, काही माध्यमांवर टीका करत हा केवळ अफवांचा भाग असल्याचे सांगण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांमुळेच हजारो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या मेळाव्यास आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले, आमदार तानाजी सावंत, आमदार राजू खरे, खासदार धैर्यशील माने, खासदार ज्योती वाघमारे, माजी आमदार शाहजीबापू पाटील, संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे  जिल्हा प्रमुख अमोल शिंदे  जिल्हा परिषदेचे सदस्य व्यंकटराव भालके दामाजी कारखान्याचे व्हाय चेअरमन  तानाजी खरात  जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष सुळे शाम गोगाव  यांच्या पंढरपूर मंगळवेढा नगरपरिषदेचे  सर्व नगरसेवक तसेच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment