वारी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी विशेष वारी सुविधा निधी उपलब्ध करावा - जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Friday, 26 June 2026

वारी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी विशेष वारी सुविधा निधी उपलब्ध करावा - जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके

वारी मार्गावरील ग्रामपंचायतींसाठी विशेष वारी सुविधा निधी उपलब्ध करावा - जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके 
 चळे -आषाढी  वारीसाठी पंढरपूरकडे,जाणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सोयीसाठी पंढरपूर तालुक्यातील वारी मार्गावरील ग्रामपंचायतींना विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य व्यंकटराव भालके यांनी जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. वारी काळात पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा व कचरा व्यवस्थापनाचा अतिरिक्त भार ग्रामपंचायतींवर पडत असल्याने स्वतंत्र "वारी सुविधा निधी" मंजूर करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य यांनी केली आहे.उपलब्ध असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले आहे.

निवेदनाद्वारे वारी मार्गावरील ग्रामपंचायतींना वारकरी संख्येनुसार विशेष निधी मंजूर करणे, स्वतंत्र वारी सुविधा निधी उपलब्ध करणे, पाणी टँकर व जलसाठा व्यवस्था उभारणे, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र फिरती शौचालये व स्नानगृहे उपलब्ध करणे, प्राथमिक आरोग्य पथके व रुग्णवाहिका तैनात करणे, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी विशेष अनुदान देणे प्रमुख मुक्कामस्थळी कायमस्वरूपी पाणी व स्वच्छता सुविधा विकसित करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment