चळे प्रतिनिधी,,,पंढरपूर : मा. अनिल दादा सावंत फाउंडेशन, पंढरपूर-मंगळवेढा यांच्या वतीने पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दहीहंडी उत्सव २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता हा उत्सव उत्साहात पार पडला.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने शहरातील नागरिक, युवक, गोविंदा पथके तसेच महिला-भगिनींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. पारंपरिक संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणाऱ्या या उत्सवात मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मा. अनिल दादा सावंत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केले होते. कार्यक्रमस्थळी आवश्यक व्यवस्था, सुरक्षा तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
नवचैतन्य तरुण मंडळाच्या वतीने दहीहंडी फोडण्यात आली.यावेळेस एकूण सहा गोविंदा पथकाने सहभाग नोंदवला होता.छत्रपती शिवाजी चौकामध्ये हजारोंचा समुदायाच्या समोर या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं प्रचंड मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाला
यावेळी उपस्थित मान्यवरांनी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ होतो, असे मत व्यक्त केले. उत्सवाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता पंढरपूर शहरात दहीहंडीचा जल्लोष मोठ्या उत्साहात साजरा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले...
यावेळी उपस्थित मान्यवर.
मा.आ.शहाजी बापू पाटील
आमदार श्री.अभिजीत आबा पाटील
मा.दिलीप बापू धोत्रे
मा.नागेश काका भोसले
नगरसेवक अक्षय गंगेकर
नगरसेवक प्रसाद भैय्या कळसे
नगरसेवक किरणराज घाडगे
नगरसेवक ओंकार जोशी
नगरसेवक धनंजय धोत्रे
नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर
सतीश आप्पा शिंदे
प्रशांत शिंदे मेंबर
अरुण भाऊ कोळी
गणेश मलपे
युवराज भोसले
नवनाथ करकमकर
संतोष सर्वगोड
अमित कसबे
माऊली आबा काळे
विश्वजीत मुन्ना भोसले
आनंद घोडके
संतोष सुळे
श्याम सर गोगाव
आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment