मल्लांनी ऑलिम्पिकचे स्वप्न बाळगावे : आ. समाधान आवताडेसरकोली येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Sunday, 27 September 2026

मल्लांनी ऑलिम्पिकचे स्वप्न बाळगावे : आ. समाधान आवताडेसरकोली येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन

मल्लांनी ऑलिम्पिकचे स्वप्न बाळगावे : आ. समाधान आवताडे
सरकोली येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन
चळे : ग्रामीण भागातील मल्लांमध्ये मोठी गुणवत्ता असून, मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवावा. सोलापूर जिल्ह्यातून हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, उपमहाराष्ट्र केसरी असे अनेक नामवंत मल्ल घडले आहेत. आता जिल्ह्यातून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा कुस्तीपटू घडविण्याचे स्वप्न मल्लांनी उराशी बाळगावे, असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी केले.
सरकोली (ता. पंढरपूर) येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, सोलापूर आणि श्री. भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सरकोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय मुले-मुली कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत तब्बल ८०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपली क्रीडा गुणवत्ता दाखविण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरतात. खेळाडूंनी मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करून कठोर परिश्रम करावेत आणि जिल्ह्याचे नाव राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे, असे आवताडे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार शिरोमणी कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे होते.
यावेळी दत्तात्रय वरकड, पैलवान सदाशिव साळुंके मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी, मोहन यादव, तालुका क्रीडा मार्गदर्शक, पै. भरत मेकाले (NIS Coach), श्री. शेखरभाऊ भोसले, यावेळी मारुती भोसले अण्णा शिंदे जयसिंग देशमुख सरपंच शिवाजी भोसले सुभाष खांडेकर अनिल नागटिळक, दीपक भोसले प्रवीण भोसले शशिकांत कराळेनितीन भोसले वैभव भोसलेतालुकाध्यक्ष राज्य कुस्तीगीर परिषद व जिल्हा सदस्य, सत्यम जाधव, माजी तालुका क्रीडा अधिकारी, मच्छिंद्र सपाटे, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य धनपाल हाबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे स्वागत सुनील भोसले तर आभार समाधान भोसले यांनी मांडले सूत्रसंचालन धनाजी मदने यांनी केले,क्रीडा प्रशिक्षक, श्री. भैरवनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, सरकोली तसेच श्री. भैरवनाथ ग्रामविकास समविचारी मंडळ आणि दत्ताभाऊ भोसले मित्र मंडळ, सरकोलीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment