चळेप्रतिनिधी,,पंढरपूर : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे सेवाभावी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मेजर कुणाल गोसावी निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करून वाढदिवस सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून साजरा करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे द्रोणाचार्य हाके,महेश धोत्रे, निरंजन कोळेकर, सोमनाथ ढोणे, प्रशांत घोडके, प्रवीण सलगर, प्रसाद कोळेकर, ज्ञानेश्वर पाटील, हनुमान शिंदे, निरंजन कोळेकर, , प्रदीप खांडेकर, अनिकेत सूर्यवंशी, मनोहर डुबल गणेश पंडित, सागर कुलकर्णी रोहिणी घोडके उमा कुलकर्णी नितीन कटक सुनिता व्यवहारे साधना गिरी गोसावी मोनिका पवारपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment