सांगली प्रचार सभेत माजी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत यांचे आवाहन - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Thursday, 15 October 2026

सांगली प्रचार सभेत माजी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत यांचे आवाहन

सांगली प्रचार सभेत माजी शिक्षक आ. दत्तात्रय सावंत यांचे आवाहन


शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध .. आमदार दत्तात्रय सावंत
चळे प्रतिनिधी- पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील रासपचे अधिकृत उमेदवार व माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी सांगलीतील प्रचार सभेत विरोधकांना ठासून आव्हान दिले. २०२०च्या निवडणुकीतील पराभवानंतर यंदा अधिक सतर्क यंत्रणा उभारली असून, कोणताही राजकीय डाव आता यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सांगली येथील प्रचार सभेत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचे आव्हानमागील निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी आम्ही सावध भूमिकेतच तुमच्या राजकीय खेल्या उध्वस्त करण्यासाठी आम्हीही आता गुणकारी औषध आणलंय.२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना विजय मिळाला होता, तर २०२० मध्ये पहिल्या पसंतीची चार हजार अधिक मते मिळाली, हा त्यांचा दावा आहे. शिक्षकांच्या निवडणुकीत राजकीय डावपेच नकोत, हे त्यांनी ठामपणे सांगितले. यावेळी ते उधळून लावण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्यांचेही त्यांनी स्पष्ट केले. महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय समाज पक्षातून त्यांना या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली आहे. पाच जिल्ह्यांतील शिक्षकांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, हा प्रतिसाद पुढील काळात आणखी वाढेल, असा त्यांचा विश्वास आहे.तसेच उर्दू शाळांसाठी स्वतंत्र प्रचार यंत्रणा उभारण्यात आली असून, सर्व घटकांपर्यत पोहोचण्यासाठी पक्षाची विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, या निवडणुकीत फक्त शिक्षकांचा हक्क आणि स्वाभिमान यांचा मुद्दा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment