पंढरीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठकशिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि पदवीधर मतदारांची मोठी उपस्थिती; शिक्षक नेते सुभाषराव माने यांच्या पाठिंब्यामुळे भाजप उमेदवारांना बळ - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Monday, 19 October 2026

पंढरीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठकशिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि पदवीधर मतदारांची मोठी उपस्थिती; शिक्षक नेते सुभाषराव माने यांच्या पाठिंब्यामुळे भाजप उमेदवारांना बळ

पंढरीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठक
शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि पदवीधर मतदारांची मोठी उपस्थिती; शिक्षक नेते सुभाषराव माने यांच्या पाठिंब्यामुळे भाजप उमेदवारांना बळ
चळे/पंढरपूर प्रतिनिधी :
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे आणि पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सौ. स्मितालाई योगेश जाधव यांच्या प्रचारार्थ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंढरपूर येथे सहविचार सभा उत्साहात पार पडली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या या सभेला पंढरपूर तालुक्यातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, पदवीधर मतदार तसेच पांडुरंग परिवार आणि परिचारक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. आगामी शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देऊन प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
सभेला भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा निरीक्षक तथा माजी आमदार कुंदन पाटील, महामंडळाचे माजी अध्यक्ष व शिक्षक नेते सुभाषराव माने सर, पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. वामनराव माने सर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीषदादा गायकवाड, उपसभापती राजूबापू गावडे यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, परिचारक समर्थक, पांडुरंग परिवाराचे कार्यकर्ते आणि मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.
सुभाषराव माने यांच्या पाठिंब्यामुळे उमेदवारांना बळ
शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात प्रभाव असलेले शिक्षक नेते सुभाषराव माने यांचा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये असलेला त्यांचा संपर्क व संघटनात्मक ताकद यामुळे कौस्तुभ गावडे आणि स्मितालाई जाधव यांच्या प्रचाराला बळ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंढरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
सहकार शिरोमणी कार्यालयात काळे समर्थकांचा मेळावा
कृषी उत्पन्न बाजार समितीतील सभेनंतर सहकार शिरोमणी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयात शिक्षक व पदवीधर मतदारांचा स्वतंत्र मेळावा पार पडला. या मेळाव्याला चेअरमन कल्याणराव काळे, उपाध्यक्ष मोहन नागटिळक, माजी उपाध्यक्ष भारत कोळेकर यांच्यासह काळे समर्थक शिक्षक, पदवीधर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दोन्ही बैठकांमधून पंढरपूर तालुक्यात भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराला गती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग, स्थानिक नेत्यांचे पाठबळ आणि विविध समर्थक गटांची उपस्थिती यामुळे शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचाराची चर्चा तालुक्यात रंगू लागली आहे.

No comments:

Post a Comment