मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांचे भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Monday, 19 May 2025

मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांचे भव्य उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन

मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांचे भव्य उद्घाटन सोहळ्यास   उपस्थित राहण्याचे आवाहन 

पंढरपूर / प्रतिनिधी

पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी धोत्रेज उद्योग समूहाच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे मंगळवारी माजी गृहराज्यमंत्री, मनसे नेते बाळा नांदगावकर, धाराशिव जनता बँकेचे चेअरमन ह.भ.प. वसंतराव नागदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे नेते अविनाश अभ्यंकर, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, माजी आमदार शहाजी बापू पाटील, लातूरचे माजी आमदार वैजनाथ शिंदे, धाराशिवचे माजी नगराध्यक्ष विश्वास शिंदे, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, जेएसपीएमचे सेक्रेटरी गिरीराज सावंत, मानसी नेते बाबू वागसकर, राजाभाऊ उंबरकर, सोलापूर मनसे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत गीद्दे, भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, काँग्रेसचे रॉकी बंगाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, माजी नगरसेवक प्रदीप पवार, दयावान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लखन चौगुले, जय भवानी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुणभाऊ कोळी, सु.रा परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील, माजी नगराध्यक्ष दगडूशेठ घोडके, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे, आरपीआय नेते सुनील सर्वगोड, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, शिवप्रेमीचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब कदम, ज्येष्ठ नेते भोसले, शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे, संभाजीयावेळी मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, अनिल बागल, गणेश पिंपळनेरकर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

ते पुढे बोलताना म्हणाले की पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आपल्या हक्काचे असलेले ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूम मंगळवारपासून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे.

या माध्यमातून शेतकऱ्यांना ग्रोमॅक्स ग्रुपच्या महिंद्रा कंपनीचे हिंदुस्तान ट्रॅक्टर, ट्रकस्टार ट्रॅक्टर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेण्यासाठी जाग्यावर कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचबरोबर शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला जाणार असून ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांना आकर्षक अशी बक्षिसे देण्यात याणार आहेत.

ट्रॅक्टर्स शोरूमच्या माध्यमातून ५० तरुणांना रोजगार मिळणार असून या अगोदर धोत्रेज उद्योग समूहाच्या पंचतारांकित हॉटेल, पेट्रोल पंप या माध्यमातून आतापर्यंत ५०० तरूणांना नोकरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील काळातही पंढरपूर शहर व तालुक्यातील तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी सदर ट्रॅक्टर्स शोरूमच्या उद्घाटन समारंभास पंढरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, प्रोप्रायटर श्रीयश दिलीप धोत्रे यांनी केले आहे.



<

No comments:

Post a Comment