आ.अभिजित पाटील आले पुन्हा चर्चेत,पायी चालत राबविला अनोखा उपक्रम,जपली सामाजिक बांधिलकी - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Monday, 21 July 2025

आ.अभिजित पाटील आले पुन्हा चर्चेत,पायी चालत राबविला अनोखा उपक्रम,जपली सामाजिक बांधिलकी

आ.अभिजित पाटील आले पुन्हा चर्चेत,पायी चालत राबविला अनोखा उपक्रम,जपली सामाजिक बांधिलकी

पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींची उपस्थितीत पांडूरंग पालखीचे पंढरपुरातून प्रस्थान

पंढरपूर ते रोपळे पायी दिंडीत आमदार अभिजीत पाटील चालत नोंदविला सहभाग


 चळे प्रतिनिधी 

 माढा विधानसभा मतदारसंघाचे आ. अभिजीत पाटील सामाजिक बांधलकी जपत  नेहमी लोकाभिमुख आगळा वेगळा उपक्रम राबवत असतात आणि या उपक्रमामुळे ते चर्चेत राहत असतात सध्या त्यांनी पायी दिंडीमध्ये सहभाग घेऊन एक अनोखा उपक्रम केला असून आमदार अभिजीत पाटील हे चर्चेत आले आहेत कारण पंढरपूर ते रोपळे दरम्यान जवळपास 20 किलोमीटर पायी चालत दिंडीत सहभाग घेतला आहे.

पांडुरंग निघाले संत सावता माळीच्या भेटीला या अभंगाप्रमाणे संत सावता माळी यांची कर्मभूमी असणाऱ्या माढा तालुक्यातील अरण या गावची आख्यायिका आहे. कामातच देव मानणाऱ्या कांदा, मुळा, भाजी आवघी विठाई माझी अशी ओळख असणाऱ्या संत सावता माळी यांच्या भेटीसाठी रविवारी कानड्या विठुरायाच्या पालखीचे अरणकडे प्रस्थान झाले.हा सोहळा अध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.या सोहळ्याचा पहिला मुक्काम पंढरपूर ते रोपळे पर्यंत असतो यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदाच आ. अभिजीत पाटील हे पांडुरंगाच्या पालखीसोबत आणि तमाम वारकरी भाविकांसोबत जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष करत “कांदा,मुळा,भाजी अवघी विठाबाई माझी” म्हणत पालखीत पायी चालत सामील झाले होते.

No comments:

Post a Comment