मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी व उपमुख्यमंत्री मा.अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार श्री समाधान दादा आवताडे साहेब यांच्या मार्गदर्शनात व माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर...
July 24, 2025
मंगळवेढा शहरातील हजरत पीर गैब-वो-मर्दाने गैब येथे आयोजित केलेल्या या उपक्रमासाठी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमास मतदारसंघाचे आमदार श्री आवताडे यांनी उपस्थित राहून या विधायक आणि लोकोपयोगी उपक्रमामध्ये सामील झालेल्या रक्तदात्यांचे विशेषतः महिला भगिनींचे विशेष कौतुक केले.
तसेच सामाजिक एकात्मता आणि सलोख्याची बंधुता अंगीकारणाऱ्या सदर समाज बांधवांनी अशा प्रकारे समाजसेवेचे कार्य पुढेही करत राहावे, अशा शुभेच्छा यानिमित्ताने दिल्या
No comments:
Post a Comment