रेशन अपहार प्रकरणी बेमुदत आमरण उपोषण
पंढरपूर प्रतिनिधी,,,
नालंदा महिला सामाजिक व आर्थिक विकास संस्था पंढरपूर या संस्थेमार्फत संत पेठ पंढरपूर येथे चालवले जाणारे स्वस्त धान्य दान क्रमांक ८३ या संस्थेने गोरगरीब कार्डधारकांना मालाचे वाटप न करता सलग दोन महिनेचे रेशन मध्ये अपहार केल्याप्रकरणी मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दन रेशन दुकानाचा परवाना निलंबित करून दंडात्मक कारवाई केली आहे.
सदर आदेश येऊन सुमारे अडीच महिने झाले तरीही जिल्हा पुरवठा गोरगरिबांच्या ताटातील घास पळविण्याऱ्यांना अभय दिले व केवळ नोटीसा काढून फौजदारी कारवाई करण्यास चाल-ढकल केले आहे. अधिकारी सोलापूर, तहसीलदार पंढरपूर यांनी रेशनचा काळाबाजार कारवाई करावी
प्रमुख मागण्या
१) नालंदा महिला सामाजिक व आर्थिक विकास संस्था दुकान नंबर ८३ यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळाला अटक करावी .
२) सदर संस्थेकडून शासकीय दंड वसूल करून त्यांना काळ्या यादीत टाकावे.
३. सदर दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून त्या ठिकाणी शासन निर्णयानुसार अर्ज मागवून दुसऱ्या पात्र संस्थेची नेमणूक करावी.
कोट,,,रेशन दुकानाचा परवाना निलंबित करून दंडात्मक कारवाई व लेखी आश्वासन दिल्याचे उपोषण सोडणार नाही =
साधनाताई रामचंद्र राऊत, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट महिला ओबीसी
No comments:
Post a Comment