सत्ताकारण व राजकारण गेलं पाहिजे यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे--उमेश पाटील, - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Saturday, 12 July 2025

सत्ताकारण व राजकारण गेलं पाहिजे यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे--उमेश पाटील,

सर्वसामान्यांच्या घरात सत्ताकारण व राजकारण गेलं पाहिजे यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे--उमेश पाटील,,July 12, 2025


 चळे प्रतिनिधी दि.-12 
सर्वसामान्यांच्या घरात सत्ताकारण आणि राजकारण गेलं पाहिजे यासाठी पक्ष संघटन मजबूत करावे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  नुतन सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले ते पंढरपूर येथे पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सर्व फंटल सेल व कार्यकारणीच्या आढावा बैठकीत बोलत होते.*

या बैठकीस राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य कल्याणराव काळे, महिला जिल्हाध्यक्षा वर्षाराणी शिंदे, महाराष्ट्र युवक प्रदेशचे उपाध्यक्ष समाधान काळे, सरचिटणीस श्रीकांत शिंदे, जिल्हा युवक अध्यक्ष अभिषेक आव्हाड, कार्याध्यक्ष अक्षय भांड, युवती जिल्हाध्यक्ष ऋतुजा सुर्वे तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक शहराध्यक्ष दिगंबर सुडके  व राष्ट्रवादीचे सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

*यावेळी बोलताना पाटील पुढे म्हणाले की राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विकसनशील महाराष्ट्राचा विचार ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करून संघटनेचा उपयोग समाजासाठी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. सोलापूर जिल्ह्याचा डीएनए  हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा असून आजही सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ता राष्ट्रवादी सोबत आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या सोबतीने सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देणार असल्याचे सांगितले.*

*यावेळी राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य कल्याण काळे यांनी सांगितले की गाव खेड्यातील तरुणाईला सोबत घेऊन पक्ष संघटनेच्या माध्यमातून गटातटाचे राजकारण न करता सर्वसामान्य लोकांपर्यंत सरकारच्या लोक कल्याणकारी योजना व कृषी विषयक योजनाची माहिती पोहोचवून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कृतिशील विचाराची  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची फळी तयार करण्याचे काम आपण सर्वांनी करावे.*

 यावेळी पंढरपूर तालुका बार असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी विकास भोसले, उपाध्यक्ष संजय व्यवहारे, सचिव शरद पवार यांची निवड झाल्याबद्दल व बोहाळी गावच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल काळे गटाच्या वैशाली संतोष शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.

 या कार्यक्रमास सहकार शिरोमणीचे व्हाईस चेअरमन भारत कोळेकर,यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन शहाजी बापू साळूंखे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन विलासराव काळे व्हा.चेअरमन हरिभाऊ मुजमुले, सिताराम साखर कारखान्याचे संचालक महादेव देठे, योगेश जाधव, पंढरपूर शहर व ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व फ्रंटल सेलचे अध्यक्ष व कार्यकारणी सदस्य, सहकार शिरेामणी साखर कारखाना, प्रतिभादेवी नागरी सह.पतसंस्था, यशवंतराव चव्हाण पतसंस्था सर्व आजी माजी संचालक,विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संखेनी  उपस्थित होते.

*कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तालुकाध्यक्ष अनिल नागटिळक यांनी मानले

No comments:

Post a Comment