वाढदिवसानिमित्त विशेष लेख --
महाराष्ट्र राज्यात सर्वश्रुत असणारे मनसेचे नेते दिलीप बापु धोत्रे त्याचां आज जन्मदिवस पंढरपूर तालुका असो की सोलापूर जिल्हा.. येथे अनेक राजकीय तरुण नेतृत्व पुढे येत आहेत. यामध्ये मनसे नेते दिलीप धोत्रे यांचाही समावेश आहे. सामान्य कुटुंबातून पुढे येत विद्यार्थी दशेपासूनच सामाजिक कार्य करत ते आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यातील एक अग्रगण्य नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. राजकारणामध्ये निष्ठावंत असणाऱ्या नेत्यांमध्ये दिलीपबापूंचे स्थान नंबर अग्रगण्य आहे. विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी राज ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारून काम सुरू ठेवले आहे. ते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. दिलीप धोत्रे यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व दिले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ते गरजूंच्या मदती करता धावून जातात. त्यांचे कार्यालय अखंड उघडे असते यामुळे सतत त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. खेळाडू असो की विद्यार्थी यांच्याही समस्या ते सतत सोडवताना दिसतात. स्वतः उच्च शिक्षित असल्याने ते तरुणांना शिक्षणाचे महत्त्व नेहमीच समजावून सांगतात.
दिलीपबापूंनी पंढरपूर भागामध्ये गरजूंना मोठी मदत आजवर केली आहे कोरोनाकाळात त्यांनी अखंड समाजातील सर्वच घटकांचा मदतीचा हात दिला. अन्नधान्याची कीट , रोजच्या वापरातील आवश्यक वस्तू, सॅनिटायझर याचबरोबर मास्क यांचे मोफत वितरण केले. ऊसतोड मजूर असो की पालावर राहणाऱ्या सर्वसामान्य घटकांनाही त्यांनी मदतीचा हात दिला. तसेच शहरात व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी गरजूंना या काळात त्यांनी मोठी मदत केली. कोरोनाकाळामध्ये रुग्णांना स्वस्त दरात उपचार मिळावेत, याकरता म्हणून त्यांनी कोविड हॉस्पिटल ही सुरू केले. या माध्यमातून अनेकांची रुग्णसेवा त्यांनी केली.
--*****
*समाजकारणाला महत्त्व देणारे हक्काचे दिलीपबापू*
सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आल्याने त्यांची दुःख व गरजा याची पुरेपूर जाणीव असल्याने मनसे नेते दिलीप धोत्रे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. आजवर त्यांनी राजकारणात मतांचा विचार न करता गरजू जनतेला मदत करण्याची भूमिका नेहमीच घेतली आहे. याचा प्रत्यय कोरोनाकाळामध्ये पंढरपूर भागातील नागरिकांनी घेतला आहे. आजही ते गरजूंना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी पुढे येताना दिसतात. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या हाती ते हक्काचे बापू बनले आहेत.
--*****
पंढरपूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम दिलीपबापूंनी स्वखर्चाने केले. ज्यामुळे वाहनधारकांची सोय झाली. याचबरोबर स्मशानभूमीची दुरुस्ती असो की रस्त्यांची काम असो त्यांनी स्वखर्चाने करून देण्याची भूमिका घेतली. पंढरपूर, मंगळवेढा या भागातील नागरिकांच्या अनेक समस्यांवर त्यांनी आवाज उठवला. आंदोलन केली तसेच सरकार दरबारी आपले वजन वापरून अनेक कामे मंजूर करून आणली.
पंढरपूर तीर्थक्षेत्र शहराचा चांगला विकास व्हावा. येथील तरुणांच्या हाताला काम मिळावे, याकरता मोठी औद्योगिक वसाहत असावी, येथे राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना राबवून नागरिकांना सोयी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी दिलीपबापू नेहमीच प्रयत्न करत असतात. यासाठी त्यांनी वेळ पडल्यावर आंदोलनही उभी केली आहेत. अलीकडच्या काळात त्यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी जबाबदारी टाकून त्यांना पक्षाचं नेतेपद दिले आहे. त्यामुळे ते राज ठाकरे यांचे विचार विविध भागात पोहोचण्यासाठी सतत दौरे करत असतात. तरीही त्यांचे लक्ष पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यावर सतत असते. ते स्वतः उद्योजक असून विविध व्यवसायाच्या माध्यमातून ते तरुणांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठीच त्यांनी अनेक उद्योग उभे केले आहेत.
सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी दिलीपबापू यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत. यामुळे त्यांची कामेही लवकर मार्गी लागत व नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत होते. त्यांना पंढरपूर शहराचा चेहरा मोहरा बदलायचा असून हे तीर्थक्षेत्र उत्कृष्ट पद्धतीने विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी त्यांचे सतत प्रयत्न सुरू असतात. राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्त्व देणारे मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांचा आज तीन ऑगस्ट रोजी वाढदिवस असून त्यांना यानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
शब्दांकन--
गणेश पिंपळनेरकर, पंढरपूर
No comments:
Post a Comment