सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची सोमनाथ आवताडे यांनी केली पाहणी.
September 20, 2025
सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची सोमनाथ आवताडे यांनी केली पाहणी.
राज्यभरात परतीच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
गेल्या चार दिवसांपूर्वी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये सततच्या होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
कालच मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, युवक नेते सोमनाथ आवताडे यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव, पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली.
याप्रसंगी सोमनाथ आवताडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
काही दिवसापूर्वी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे संवेदनशील आमदार समाधान आवताडे यांनी दूरध्वनी वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. तसेच अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेती पिके व फळबागांचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या होत्या.
याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुकास्तरावरील महसूल अधिकारी व कृषी विभागाच्या वतीने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठवल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
पंचनामे करत असताना शेतकऱ्याने आपल्या नुकसान झालेल्या सर्व पिकांचे काळजीपूर्वक पंचनामे करून घ्यावे याबाबत काहीही अडचणी किंवा सहकार्य मिळत नसेल तर आमदार समाधानदादा आवताडे जनसंपर्क कार्यालय पंढरपूर व मंगळवेढा या संपर्क कार्यालयाकडे करावी.. असे आवाहन सोमनाथ अवताडे यांनी केले.
यावेळी मा उपसभापती विजयसिंह देशमुख, दादा घायाळ भास्कर दांडगे बिभीषण बोरगावे धनंजय पवार अभिजीत माने बालाजी अवताडे आदी उपस्थित होते
No comments:
Post a Comment