पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजप प्रचारात आघाडीवर, प्रभाग क्रमांक ९ आणि १० मधील लोकांशी संवाद
पंढरपूर, (प्रतिनिधी)
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्षाने जोरदार मुसंडी मारत प्रचारात आघाडी घेतली असून आज बुधवार दि२६ नोव्हेंबर रोजी प्रभाग क्रमांक ९आणि १०मध्ये ढोलताशांच्या गजरात हलग्यांच्या कडकडाटात जल्लोषात रॅली काढण्यात आली यावेळी भाजप चे अधिकृत उमेद्वार सौ उषा अरुण मंजरतकर आणि वैभव शहाजी भोसले हे दोघेही उपस्थित होते.
प्रचारफेरीचा शुभारंभ माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, पंढरपूर अर्बन बँकेचे
सतीश मुळे, प्रताप चव्हाण, रा. पा कटेकर, प्रा. सुभाष म्हस्के प्रभागातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.
पंढरपूर शहरात गेल्या २५वर्षात विविध विकासकामे पूर्ण होऊन शहराचे रुपडे पालटले आहे, विविध विकासकामे होण अध्यक्ष ार असून उपनगरातील रस्ते
सिमेंट काँक्रिट चे झाले आ हेत. शहरात लवकरच उड्डाणपूल उभारण्यात येणार असून तीर्थक्षेत्र पंढरपूर चे अनोखे रूप पहावयास मिळणार आहे, हा सर्व विकास दूरदृष्टी असणारे आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यक्षमतेवर पूर्ण झाले असून अजून मोठी कामे होणार आहेत, यासाठी
सत्ताधारी भाजप आणि शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना नगरपालिकेत पाठविले पाहिजे तरच पंढरपूर येथील विकास होणार असून कायापालट झा-लेला दिसून येणार आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी प्रभागातील नागरिकांच्या सोइसुविधेसाठी चर्चा केली, लोकांशी संवाद साधून साथ देण्यासाठी आवाहन केले. भाजप पक्षाच्या प्रचार फेरीस भोसले चौक भागातील हजारो युवक, महिला, भगिनी सहभागी झाल्या होत्या, हा उस्फुर्त प्रतिसाद पाहून भाजप आणि शहर विकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस यश मिळणार याची ग्वाही मिळत होती.
No comments:
Post a Comment