मायबाप जनतेला सोबत घेऊन तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Sunday, 23 November 2025

मायबाप जनतेला सोबत घेऊन तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ

मायबाप जनतेला सोबत घेऊन तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ 

 चळे प्रतिनिधी,,,नामदेव पायरी येथे पूजा करून विठ्ठलाला साकडे घालत नारळ वाढवून तीर्थक्षेत्र विकास आघाडीने मायबाप जनतेला सोबत घेत प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिताताई भगीरथ भालके त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व ३५ उमेदवार व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली.

यावेळी नामदेव पायरी येथून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ही पदयात्रा महाद्वार चौक, कालिकादेवी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, काळा मारुती मंदिर, चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक व महात्मा फुले चौक येथे पदयात्रा आल्यानंतर त्या ठिकाणी सभा पार पडली. 

पदयात्रेमध्ये तरुणांचा तसेच महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. मोठ्या जल्लोषात  सुरू असलेल्या पदयात्रेत ठिकठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिताताई भालके व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या जात होत्या.

No comments:

Post a Comment