आ. राजू खरे यांचा विकास कामांसाठी धूमधडाका..! चळे येथे कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ Jan 7, 2026 - 1 - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Thursday, 8 January 2026

आ. राजू खरे यांचा विकास कामांसाठी धूमधडाका..! चळे येथे कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ Jan 7, 2026 - 1

आ. राजू खरे यांचा विकास कामांसाठी धूमधडाका..! चळे येथे कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ 

आ. राजू खरे यांचा विकास कामांसाठी धूमधडाका..!  चळे येथे कोटीच्या विकास कामाचा शुभारंभ 

पंढरपूर /प्रतिनिधी 

मोहोळ ,पंढरपूर ,उत्तर सोलापूर या विधानसभा राखीव मतदार संघातील विकासप्रिय आमदार राजू खरे यांनी मतदारसंघात कोट्यावधीचा निधी आणून विकास कामास सुरुवात केली आहे. मागील अनेक दिवसात विविध भागातील भूमिपूजने आणि उद्घाटने यांचा धुमधडाका सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूर तालुक्यातील तळे येथे कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभही आमदार राजू खरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ . राजू खरे यांनी सांगितले की,ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य दिल्यास सर्वसामान्य जनताही आमदार म्हणून निवडून देते, हे मी स्वतः अनुभवले आहे. वंचित असणाऱ्या गावांना विकास कामे देऊन न्याय देण्याची माझी भूमिका कायमच राहील.जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये विस्कळीत झालेली नेतेमंडळीला एकत्र करून मोठ्या ताकतीने निवडणुकीला सामोरे जाणार आहे. यापुढील काळातही विकासकामांना प्राधान्य देणार असल्याचे आ. राजू खरे यांनी सांगितले.
 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश  गायकवाड होते
 मोहोळ राखीव विधानसभा मतदार संघाचेआमदार राजू खरेयांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून मौजे चळे, ता. पंढरपूर ईजिमा-६१ रस्ता ते बामण पट्टीआसबवस्ती०२,कि.मी.चळेपर्यंत मजबुतीकरण करणे मंजूर रक्कम,रु.50 लाख करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन तसेच,मौजे चळे ते सुस्ते रस्ता, ता. पंढरपूर रस्ता  २ दोन किलोमीटर  पूर्ण झालेल्या खडीकरण रु.30 लाख लोकार्पण तसेच चळे ते कांढारकी,  २ किलोमीटर रस्त्याचे   रु.20 लाख खर्चून पूर्ण केलेल्या मजबूती करण लोकार्पण सोहळा  श्रीफळ वाढून करण्यात आला, आ.राजाभाऊ खरे यांनी 
 भरीव निधी मंजुरी दिल्याबद्दल आ  राजू खरे यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. यावेळी बहुसंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, यावेळी विठ्ठलचे संचालक उमेश मारे माजी उपसरपंच राजाभाऊ गायकवाड माजी उपसरपं अनिल गायकवाड,  चेअरमन  सोसायटी श्रीनिवास बनसोडे, पटू गायकवाड , शहाजी गायकवाड बाळासो मोरे धनाजी वाघ, विठ्ठलशिंदे, उत्तम वाघ, सुरेश घाडगे अनिल गायकवाड, रामचंद्र शिंदे, आबा,खिलारे  म्हाळाप्पा  बनसोडे, बालाजी बनसोडे बापू सोनटक्के  विजय वाघमारे श्रीकांत पंडीत लेखन वाघमारे, आधी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment