अजून.. आम्ही एक झालो..!विठ्ठल सह साखर कारखान्याचे आजी-माजी चेअरमननी केले जाहीर,,मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कार्यालयात केली घोषणा - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Sunday, 1 February 2026

अजून.. आम्ही एक झालो..!विठ्ठल सह साखर कारखान्याचे आजी-माजी चेअरमननी केले जाहीर,,मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कार्यालयात केली घोषणा

अजून.. आम्ही एक झालो..!विठ्ठल सह साखर कारखान्याचे आजी-माजी चेअरमननी केले जाहीर,,मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कार्यालयात केली घोषणाJan 31, 2026 


अजून.. आम्ही एक झालो..!*  *विठ्ठल सह साखर कारखान्याचे आजी-माजी चेअरमननी केले जाहीर*  *मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या कार्यालयात केली घोषणा*

 चळे /प्रतिनिधी 

नुकत्याच पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी विठ्ठल परिवार एकत्रित येऊन, तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीत सत्तांतर घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले होते. त्याला यश मिळाले होते. त्यानंतर या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजीतआबा पाटील आणि माजी चेअरमन भगीरथदादा भालके यांची युती करण्यात पुन्हा एकदा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांना यश मिळाले आहे. 
  मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संपर्क कार्यालयात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. अभिजीत पाटील यांनी एकत्रितपणे येऊन आम्ही आता या निवडणुकीसाठी ही एकत्रित आलो असल्याची घोषणा केली आहे. 
   सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवाराची दुपारी निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले होते. यामध्ये सहकार शिरोमणी चे चेअरमन कल्याणराव काळे, युवराजदादा पाटील, गणेशदादा पाटील यांनी भाजप बरोबर प्रचार सुरू करीत आपल्या कुटुंबातील व्यक्तींना भाजपच्या कमळ चिन्हावर उमेदवारी दिली आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनीही आपले स्वतंत्र विचाराचे उमेदवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून उभे केले होते. तर विठ्ठल चे माझी चेअरमन भगीरथ भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातूनही आपले विचाराचे उमेदवार पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उतरवले होते. या निवडणुकीची तयारीही आपापल्या परीने उमेदवारांनी सुरू ठेवली होती. आज शनिवारी आमदार अभिजीत पाटील आणि भगीरथदादा भालके यांनी आम्ही दोघे एक झालो असल्याचे जाहीर केले आहे त्यामुळे या दोघांच्या सहमतीचे उमेदवार नेमके कोण? हे मात्र काही वेळाने सांगणार असल्याचे त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे. 
    वाखरी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीवरून भालके आणि पाटील यांच्यातील युती  फिसकटली असल्याचे जाहीर होते. मात्र त्या ठिकाणी असलेली जागा आ. अभिजीत पाटील गटाला देवून बागल यांना उमेदवारी देत. भाजपचे उमेदवार मोनिका समाधान काळे यांना एकास एक लढत देण्याचा मार्ग काढला असल्याचे दिसून येत होते. तशाच प्रकारे इतरही काही गट आणि पंचायत समिती गणातील उमेदवारा मधून कोणता गट कोणाच्या वाट्याला जाणार हे रात्री उशिरापर्यंत समजणार आहे. 
   या मनसे येथील कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेच्या वेळी मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे पंढरपूरचे नगरसेवक नागेशकाका भोसले . यांच्यासह आमदार अभिजीत पाटील आणि भगीरथ भालके यांचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment