मोहोळ राखीव मतदारसंघात दोन कोटीचा निधी मंजूर, आ. राजू खरे - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Monday, 23 February 2026

मोहोळ राखीव मतदारसंघात दोन कोटीचा निधी मंजूर, आ. राजू खरे

मोहोळ राखीव  मतदारसंघात दोन कोटीचा निधी मंजूर,  आ. राजू खरे यांच्या प्रयत्नाने सामाजिक न्याय विभागाकडून कामे मंजूर,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने  तर  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या प्रयत्नाने वस्तीतील कामे होणार सुरू

*मोहोळ राखीव  मतदारसंघात दोन कोटीचा निधी मंजूर*   *आ. राजू खरे यांच्या प्रयत्नाने सामाजिक न्याय विभागाकडून कामे मंजूर*  *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने  तर  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या प्रयत्नाने वस्तीतील कामे होणार सुरू* 

 चळे प्रतिनिधी 

मोहोळ _पंढरपूर_ उत्तर सोलापूर विधानसभा राखीव मतदार संघाचे विकासप्रिय आ. राजू खरे यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास होण्यासाठी विविध प्रकारच्या निधीची मागणी सरकारकडे केली आहे. यातील दोन कोटीचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून नुकताच मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आ. राजू खरे यांनी दिली आहे.
   आ. राजू खरे यांनी ६नोव्हेंबर २०२५रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट यांच्याकडे डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत विकास कामासाठी निधी मिळावा यासाठी निवेदन दिले होते. याची दखल घेत, राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या विशेष प्रयत्नातून हा दोन कोटी रुपयाचा निधी नुकताच मंजूर करण्यात आला आहे. 
   या दोन कोटी रुपयांमध्ये १८ गावातून प्रत्येकी दहा लाख रुपये तर मोहोळ तालुक्यातील ढोक बाभूळगाव येथील आंबेडकर नगर मध्ये समाज मंदिर बांधण्यासाठी वीस लाख रुपये याप्रमाणे विकासनिधी देण्यात आला आहे .या निधीमधून दलित वस्ती मधील कामे मार्गी लागणार आहेत. मोहोळ मतदार संघातील एकूण १९गावातील दलित वस्तीमध्ये दोन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

या मंजूर निधीतील विविध गावाची नावे पुढीलप्रमाणे आहेत. मौजे कोन्हेरी  तालुका मोहोळ येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये संविधान सभागृह बांधणे, 
मौजे आंबे तालुका पंढरपूर येथे दलित वस्तीमध्ये पेविंग ब्लॉक बसविणे. मौजे पोहोरगांव तालुका पंढरपूर येथे नवबौध्द घटकांच्या स्मशानभूमी कॉक्रीट रस्ता करणे. मौजे ढोक बाभूळगांव तालुका मोहोळ आंबेडकर नगर मध्ये समाज मंदीर बांधणे.
मौजे डिकसळ तालुका मोहोळ येथे दलित स्मशानभूमीस वॉल कंपाऊंड बांधणे.

मौजे कोरवली तालुका मोहोळ भीमनगर येथे भूमीगत गटार बांधणे. मौजे डिकसळ तालुका मोहोळ येथे मागासवर्गीय स्मशानभूमीस वॉल कंपाऊंड बांधणे. 
मौजे पाटकुल तालुका मोहोळ  येथे आंबेडकर नगर मध्ये संविधान सभागृह बांधणे. मौजे खंडाळी तालुका मोहोळ येथे  आंबेडकर नगर मध्ये समाज मंदीराला वॉल कंपाऊंड तर मौजे सय्यद वरवडे तालुका मोहोळ  येथे दलित संविधान बांधणे.   
मौजे फूलचिंचोली  येथे नागनाथ प्रक्षाळे ते वसंत बनसोडे घर कॉक्रीट रस्ता करणे.मौजे जामगांव बुद्रुक दलित वस्ती स्मशान भूमी वॉल कंपाऊंड बांधणे.मौजे टाकळी सिकंदर येथे बौध्द विहार बांधणे.मौजे चळे येथे आंबे रोड ते भिमराव मोरे यांचे घरापर्यत कॉक्रीट रस्ता तयार करणे. मौजे आँढी आंबेडकर नगर मध्ये कॉक्रीट रस्ता तयार करणे. 
मौजे नजीक पिंपरी दलित वस्ती सभागृह बांधणे. 
मौजे चिखली जजरथ गवळी घर ते बौध्दविहार कॉक्रीट रस्ता तयार करणे. मौजे चळे येथील ज्ञानू अंकुर शाळा ते कोयना नगर रोड येथे कॉक्रीट रस्ता तयार करणे.मौजे आंढेगांव येथे भीमनगर येथे भूमीगत गटार बांधणे. या गावातील कामाकरीता दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
    आमदार राजू खरे हे राखीव मतदार संघातून विजयी झाले आहेत त्यांना या दलित वस्तीतील विकास कामासाठी हा पहिल्यांदाच निधी मंजूर करण्यात आला आहे. ते विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे त्यांना आजपर्यंतचा निधी मंजूर करण्यात आला नव्हता मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी विशेष करून आमदार राजू खरे यांना हा निधी दिला आहे.

No comments:

Post a Comment