नागरिकांनी शासकीय कागदपत्रांचा माहिती घ्यावीे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Friday, 17 April 2026

नागरिकांनी शासकीय कागदपत्रांचा माहिती घ्यावीे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर प्रतिनिधी,,,आज दिनांक 10/04/2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान श्री सद्गुरू सिताराम महाराज मठ खर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या शिबिरासाठी मा.उपविभागीय अधिकारी पंढरपूर श्री सचिनजी इथापे मा.तहसीलदार श्री सचिनजी लंगुटे पंचायत समितीचे सभापती डॉ शुभम आगवणे , मा.प्रणव परिचारक, उपाधीक्षक भूमी अभिलेख पूजा अवताडे मॅडम व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरात महसूल विभागाशी संबंधित विविध प्रकरणे जसे की ७/१२ उतारे, नामांतरण, वारस नोंद, जमीन मोजणी, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र इत्यादी तातडीने निकाली काढण्यावर भर देण्यात आला. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर त्वरित कार्यवाही केली.शिबिरादरम्यान अनेक प्रलंबित प्रकरणांचा जागेवरच निपटारा करण्यात आला असून, काही प्रकरणे तातडीने मार्गी लावण्यासाठी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सरकारी कार्यालयांचे वारंवार चकरा मारण्यापासून दिलासा मिळाला आहे.या उपक्रमामुळे महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, जबाबदार व नागरिकाभिमुख बनण्यास मदत होत असून, शासनाच्या “जनतेच्या दारी शासन” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न होत आहे.कार्यक्रमास विविध अधिकारी, स्थानिक पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. शासनाच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.

No comments:

Post a Comment