प्रतिनिधी,,,पुळुज तालुका पंढरपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व संविधान प्रस्तावना वाटप कार्यक्रम मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांच्या हस्ते पार पडला यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून संविधानाच्या प्रस्तावनेच्या प्रतींचे वितरण करण्यात आले. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या मूल्यांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला पाहिजेबाबासाहेबांच्या विचारांवर चालत समाजात समता, शिक्षण आणि आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आमदार राजू खरे यावेळी म्हणाले त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र, पुळुज येथे भेट देऊन तेथील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. उपस्थित डॉक्टरांनी काही अडचणी व समस्या मांडल्या असून त्या सोडवण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच आरोग्य सुविधा अधिक सक्षम व परिणामकारक कशा करता येतील याबाबत उपस्थितांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन श्री मनोज कुमार सावंत,वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल भोसले यांनी केले होते. यावेळी सौ. दुर्गाताई अंकुशराव जिल्हा परिषद सदस्य, , श्री व्यंकटराव भालके जिल्हा परिषद सदस्य.सौ. ज्योतीताई पांढरे पंचायत समिती सदस, सौ. प्रियंका जाधव,पंचायत समिती सदस्य, श्री विश्वराज महाडिक सरपंच, पुळुज, श्री रतिलाल गावडे, उपसरपंचश्री अमोल बाबर ग्रामपंचायत , सौ. मोबीना मुलाने मा.पंचायत समिती सदस्य), श्री लवटे, श्री जगदाळे, श्री जमादार, श्री माणिक बाबर, श्री राजाराम बाबर, श्री पांडुरंग तात्या ताठे, श्री सचिन बाबर, श्री पंकज गावडे, श्री महादेव शिंदे, श्री बाबुराव गायकवाड, श्री अनिल सावंत, श्री विश्वास सावंत, श्री समीर सावंत, श्री किसन जाधव, श्री विनोद सावंत, श्री लक्ष्मण तात्या पांढरे, श्री धनंजय देशमुख, श्री संदीप देवकते, श्री बंडू बाबर, श्री शिवाजी शेंडगे, श्री लिंगदेव शेंडगे, श्री मारुती सावंत, श्री अनिल सावंत मंडळाचे अध्यक्ष, श्री अमर सावंत उपाध्यक्ष यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबासाहेबांच्या विचारांवर चालत समाजात समता, शिक्षण आणि आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
Saturday, 18 April 2026
Home
पंढरपूर
शिक्षण आणि आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आमदार राजू खरे
शिक्षण आणि आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे असे आमदार राजू खरे
Tags
# पंढरपूर
About Chanakyatimesnews
पंढरपूर
Labels:
पंढरपूर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment