सोलापूर विधानपरिषदेची भाजपाकडून प्रशांत परिचारक यांना संधी..? - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Wednesday, 20 May 2026

सोलापूर विधानपरिषदेची भाजपाकडून प्रशांत परिचारक यांना संधी..?

सोलापूर विधानपरिषदेची भाजपाकडून प्रशांत परिचारक यांना संधी..?May 20, 2026

विधानपरिषदेसाठी दूरदृष्टीनेता प्रशांत परिचारक यांची निष्ठा पणाला...!

 चळेप्रतिनिधी,,,रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांनंतर आता विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.नुकतीच महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकांची घोषणा करण्यात आल्याने सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.संघटनात्मक काम आणि जिल्ह्यातील सर्व मातब्बर नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेता भाजपकडून परिचारक यांच्या नावाला प्राधान्य देतील असे जाणकारांचे म्हणणे आहे. येत्या २५ मे ते १ जून २०२६ पर्यंत सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरण्याची मदत असून यासाठीचे मतदान १८ जून रोजी होणार असून मतमोजणी २२ जून रोजी होणार असल्याने सत्ताधारी भारतीय जनता पार्टीकडून कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली असून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. मागील काही दिवसांपासून सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. नुकतीच सदरची निवडणूक जाहीर झाली असून भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यात भाजप पक्ष गावखेड्यापर्यंत तसेच शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी परिचारक यांनी सातत्याने संघटनात्मक काम केले आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवत पक्षाची मजबूत बांधणी करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. पंढरपूर नगरपालिका, पंढरपूर पंचायत समिती, पांडुरंग सहकारी साखर कारखाना तसेच पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अनेक दशकांपासून भाजपा प्रणित परिचारक गटाचे वर्चस्व राहिले आहे. याचबरोबर पांडुरंग परिवाराच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क ठेवला असून पंढरपूर अर्बन बँकेच्या माध्यमातून नागरिकांचे अर्थकारण मजबूत ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. दररोज भरणाऱ्या जनता दरबाराच्या माध्यमातून शहर व तालुक्याच्या विकासासाठी विविध पातळ्यांवर पुढाकार घेतल्याचे त्यांच्या समर्थकांकडून सांगितले जात आहे. अनेक दिवसांपासून भेडसावणाऱ्या पंढरपूर शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रिंग रोड उभारणीसाठीही प्रशांत परिचारक यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याची चर्चा आहे. तसेच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा भाजपाचा आमदार निवडून आणण्यातही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. याचबरोबर परिचारक घराण्याची जिल्हाभरात असलेली मोठी कार्यकर्त्यांची फळी, ग्रामीण भागातील मजबूत जनसंपर्क आणि मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर मातब्बर नेत्यांशी असलेले सलोख्याचे संबंध लक्षात घेता भाजपकडून प्रशांत परिचारक यांच्या नावाला प्राधान्य दिले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. भारतीय जनता पार्टीकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, युवक नेते बाळराजे पाटील, रणजीत शिंदे, माजी आमदार दिलीप माने, राम सातपुते या मातब्बर नेते मंडळींची नावे चर्चेत असली तरी सदर निवडणुकीत सत्ताधारी भाजपाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका महत्त्वाची मानवी जाणार असून येत्या काही दिवसांत उमेदवारीबाबत चित्र अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही निवडणूक जिल्ह्याच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार असल्याचे मानले जात आहे

No comments:

Post a Comment