पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ एक आदर्श प्रशासक होत्या, सौ तृप्ती ताई खरे - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Sunday, 31 May 2026

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ एक आदर्श प्रशासक होत्या, सौ तृप्ती ताई खरे

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ एक आदर्श प्रशासक होत्या, तर त्या हिंदू धर्माच्या महान रक्षणकर्त्या होत्या. असे प्रतिपादन मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ खरे यांच्या पत्नी तृप्ती खरे यांनी चळे  येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त  निमित्त व्यक्त केले
  चळे येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त  निमित्त प्रतिमापूजन आमदार राजू खरे यांच्या पत्नीचे तृप्ती खरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या.
  यावेळी बोलताना तृप्ती खरे म्हणाले की 'पुण्यश्लोक' कोणी नाहीगर्व जिचा आहे.या मराठी ह्रदयाला एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकरच– हिंदू धर्मरक्षिणी लोकमाता अहिल्यादेवी होळकर चौंडीच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या आणि माळव्याच्या सिंहासनावर विराजमान झालेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर या केवळ एक आदर्श प्रशासक नव्हत्या, तर त्या हिंदू धर्माच्या महान रक्षणकर्त्या होत्या.औरंगजेबाच्या आक्रमणानंतर देशभरातील अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली होती. अशा काळात अहिल्यादेवींनी काशी विश्वनाथ, सोमनाथ, महाकालेश्वर, त्र्यंबकेश्वर, गया, रामेश्वरम यांसह शेकडो देवस्थानांचा जीर्णोद्धार करून हिंदू संस्कृतीला नवे जीवन दिले.म्हणूनच इतिहास त्यांचा उल्लेख "हिंदू धर्मरक्षिणी" म्हणून करतो.
आज तीनशे वर्षांनंतरही त्यांच्या कार्याचा ठसा भारताच्या कानाकोपऱ्यात दिसून येतो. मंदिरांवरील कळस, गाभाऱ्यातील दिव्यांचे तेज, मंदिरांवर डौलाने फडकणारा भगवा ध्वज आणि प्रत्येक हिंदूच्या अंगणात असलेली पवित्र तुळस ही त्यांच्या धर्मसंरक्षणाच्या कार्याची जिवंत स्मारके आहेत.अहिल्यादेवींनी एका हातात शास्त्र आणि दुसऱ्या हातात शस्त्र घेऊन राज्यकारभार केला. न्याय, धर्म, संस्कृती आणि जनकल्याण यांचा सुंदर संगम त्यांच्या कारकिर्दीत दिसून येतो.सत्ता त्यांच्यासाठी वैभव नव्हती, तर ती जनसेवेचे साधन होती. म्हणूनच जनतेने त्यांना "लोकमाता" ही उपाधी दिली आणि इतिहासाने "पुण्यश्लोक" म्हणून अमरत्व बहाल केल.पंढरपूरबाजार समितीचे सभापती हरीश  दादा गायकवाड  सोसायटी , विठ्ठल् कारखान्याचे माजी संचालक संतोष गायकवाड, माजी उपसरपंच भास्कर मोरे  सोसायटी चेअरमन प्रताप मोरे, सरपंचज्ञानेश्वर शिखरे माजी उपसरपंच राजाराम गायकवाड , सदस्य अतुल मोरे सोसायटी नंबर दोन चेअरमन श्रीनिवास बनसोडे, डॉ. रामदास घाडगे, युवराज् गायकवाड, बंडू मोरे, प्रताप गायकवाड सुधाकर मोरे सचिन वाघमोडे, बालाजी बनसोडे,नवनाथ वाघमोडे पत्रकार धनंजय वाघमोडेऔदुंबर सरिक, बापू  सरिक  लिंगेश्वर सरिक, महावीर बनसोडे सत्यवान बनसोडे हनुमंत बनसोडे दत्त वाघमोडे, विकास वाघमोडे, करण वाघमोडे, राहुल बनसोडे, डॉक्टर अजय वाघमोडे समस्त धनगर समाजबांधव आदी उपस्थित होते. 
 फोटो ओळी,,, चळे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त बोलताना आमदार राजू खरे  यांच्या पत्नी सौ तृप्ती ताई खरे व धनगर समाज बांधव

No comments:

Post a Comment