मोहोळचा समावेश पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात नको
: चळे प्रतिनिधी,, नव्याने होणाऱ्या पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोहोळ तालुक्याचा समावेश न करता पंढरपूर ऐवजी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यामध्ये करण्यात यावा अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावर सकारात्मक प्रतिसाद असल्याचे त्यांनी सांगीतले मोहोळ विधानसभा
मतदारसंघातील मोहोळ तालुक्याचा समावेश अप्पर जिल्हाधिकारी पंढरपूर अंतर्गत दर्शविण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये करण्यात आला आहे. परंतु मोहोळ तालुक्यासाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय हे जवळचे व सोईचे ठिकाण आहे. मोहोळ तालुक्यातील जनतेसाठी पंढरपूर ऐवजी सोलापूरला जाणे अत्यंत सोयीस्कर आहे. मोहोळ तालुक्याचा समावेश पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयास केल्यास लांबचे ठिकाण असल्यामुळे वाहतुकीसाठी सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा त्रास सहन
करावा लागणार आहे. मोहोळ तालुक्याची हद्द सावळेश्वरच्या पुढे संपते अन् सोलापूर लागते. त्यामुळे त्यात बदल करून मोहोळ तालुक्याचा समावेश पूर्वीच्या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात करावा अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आमदार राजू खरे यांनी केली. याबाबत या सर्व बाबी महसूत्रमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर महसूलमंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आ. खरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment