पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करावेः आ. खरे - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Tuesday, 28 July 2026

पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करावेः आ. खरे

पाणी सोडण्याचे योग्य नियोजन करावेः आ. खरे
चळे प्रतिनिधी,,,,मागील काही वर्षात उजनी धरणातून पाणी अनियमित प्रकारे सोडल्याने
सातत्याने पूरस्थिती निर्माण होवून शेतकऱ्यांचे, शेती पिकांचे आणि शेती उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा ती परिस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन केले जावे अशी मागणी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी निवेदनाद्वारे पालकमंत्री, जलसंपदा मंत्री व सोलापूरचे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणात येणारा पाण्याचा विसर्ग ७२ हजार क्यूसेक पर्यंत वाढला आहे. तसेच धरणातील पाणी साठा ८२ टक्के हून अधिक झाला आहे. पावसाळ्याचे आणखी किमान दोन महिने बाकी असताना उजनी धरण शंभर टक्के भरण्याकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. सध्या धरणातून मुख्य

कालवा आणि सीना - माढा बोगद्यातून पाणी सोडले जात आहे. मात्र धरणातून भीमा नदीला पाणी सोडलेले नाही. येणाऱ्या काळात भीमा नदीला पूरस्थिती निर्माण होऊन नदीकाठच्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची उजनी धरण व्यवस्थापनाने काळजी घेण्याची गरज आहे.

मागील काही वर्षात उजनी धरणातून पाणी अनियमित प्रकारे सोडल्याने सातत्याने पूरस्थिती निर्माण होवून शेतकऱ्यांचे, शेती पिकांचे आणि शेती उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झालेले आहे. यंदा ती परिस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन केले जावे. त्याचबरोबर धरणातील पाणी साठ्याचा, पाणलोट क्षेत्रातील पावसाचा आणि धरणात येणाऱ्या विसर्गाचा दररोज आढावा घेऊन पाणी सोडण्याचे नियोजन करावे, आणि पूरस्थिती टाळावी अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment