नगराध्यक्षा डॉ.प्रणिताताई भालके यांच्या मागणीची दखल,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीस अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Thursday, 23 July 2026

नगराध्यक्षा डॉ.प्रणिताताई भालके यांच्या मागणीची दखल,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीस अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट

नगराध्यक्षा डॉ.प्रणिताताई भालके यांच्या मागणीची दखल**.*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीस  अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट

Jul 23, 2026 - 16:45
530
    "*नगराध्यक्षा डॉ.प्रणिताताई भालके यांच्या मागणीची दखल**.*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीस  अत्याधुनिक रुग्णवाहिका भेट*

पंढरपूर /प्रतिनिधी 

: पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रणिताताई भालके यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक व सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीस अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
या रुग्णवाहिकेचे लोकार्पण राज्याचे रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनिनाथ औसेकर महराज, मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, प्रशासकीय अधिकारी राजेंद्र शेळके, पंढरपूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, शिवसेनेचे नाना मोरे, नाना निंबाळकर, गोविंद पवार, सुधीर घोडके, डॉ. संतोष यादव, नवनाथ लोखंडे यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते.   
पंढरपूरमध्ये आषाढी, कार्तिकी आणि इतर उत्सवांच्या काळात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा वेळी आपत्कालीन वैद्यकीय सेवा तातडीने उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असते. नव्याने उपलब्ध झालेल्या या अत्याधुनिक रुग्णवाहिकेमुळे आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात हलविणे अधिक सुलभ होणार असून मंदिर परिसरातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे असल्याची माहिती नगराध्यक्षा भालके यांनी सांगितली. 
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल नगराध्यक्षा सौ. प्रणिताताई भालके यांनी उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर तसेच मंत्री मा.भरतशेठ गोगावले यांचे मनःपूर्वक आभार मानले. भाविकांच्या सेवेसाठी शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे श्रीक्षेत्र पंढरपूरमधील आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून लाखो वारकरी व भाविकांना त्याचा लाभ होणार आहे.

No comments:

Post a Comment