पंढरपूरच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व
मा. दिलीप (बापू) धोत्रे
चळेप्रतिनिधी,,,,पंढरपूरच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वेगळ्या कार्यशैलीने आणि जनसंपर्काच्या बळावर ठसा उमटवणारे नाव म्हणजे दिलीप बापू धोत्रे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण करत त्यांनी विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. एक नेता, एक झेंडा, एक पक्ष या भूमिकेशी कायम प्रामाणिक राहत त्यांनी राजकीय प्रवासाबरोबरच सामाजिक कार्यालाही तितकेच महत्त्व दिल्यान आतक्रमण कारवाइमुळ व्यवसाय गमावलल्या नागारकाना,आर्थिक आधार देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. विविध जाती-धर्मांतील नागरिकांना देवदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देत सामाजिक ऐक्याची भावना अधिक दृढ करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. पंढरपूरच्या स्थानिक राजकारणातही त्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या राजकीय रणनीतीमुळे सत्तांतर घडल्याची चर्चा झाली आणि त्यांना "किंगमेकर" म्हणूनही ओळख मिळाली. कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे, प्रभावी जनसंपर्क आणि संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. वारकरी भाविकांच्या तत्परतेमुळे त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि यशस्वी उपचारांनंतर ते सुखरूप बरे झाले. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे आणि विठ्ठलभक्तीमुळेच त्यांच्यावर पांडुरंगाची कृपा असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. अलीकडेच ईशान्य भारतातील मणिपूर येथे उभारण्यात येणाऱ्या विठ्ठल मंदिरासाठी त्यांनी पाच लाख रुपयांच्या देणगीची घोषणा केली. या योगदानातून त्यांच्या विठ्ठलभक्तीबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक जतनाबद्दलची बांधिलकीही अधोरेखित झाली आहे. राजकारण, समाजकारण, धर्मकारण आणि जनसेवा यांचा समतोल साधत दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूरच्या सार्वजनिक जीवनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. संघर्षातून उभे राहून जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेले हे नेतृत्व आजही सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असल्याने त्यांना पंढरपूरच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व म्हणून ओळखले जाते.
No comments:
Post a Comment