अमोल जाधव यांना पांडुरंग पावला; मिळाली पंढरपूरची पोस्टिंग - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Tuesday, 4 August 2026

अमोल जाधव यांना पांडुरंग पावला; मिळाली पंढरपूरची पोस्टिंग

अमोल जाधव यांना पांडुरंग पावला; मिळाली पंढरपूरची पोस्टिंग

  August 4, 2026

चळे प्रतिनिधी,सोलापूर पंढरपूरचे प्रभारी गटविकास अधिकारी अमोल जाधव यांना आषाढी वारीत पांडुरंगाची सेवा केलेले फळ मिळाले आहे. पंढरपूरचे गटविकास अधिकारी म्हणून त्यांना कायमची पोस्टिंग मिळाली आहे.

जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक म्हणून अमोल जाधव हे गेल्या दोन वर्षापासून काम पाहत होते. पंढरपूरच्या बीडीओंची बदली झाल्यानंतर त्यांना अतिरिक्त पदभार मिळाला होता. नुकत्याच झालेल्या आषाढीवारीच्या काळात त्यांनी वारकऱ्यांची मोठी सेवा बजावली. पालखी मार्गावरील व्यवस्थेबरोबरच यंदा प्रथमच त्यांनी पुण्यापासून स्वच्छतागृहाची व्यवस्थाचे काम पाहिले. तिन्ही जिल्ह्याचे स्वच्छतागृहाचे तिन्ही जिल्ह्याचे टेंडर फायनल करून स्वच्छतागृहाची यंत्रणा यशस्वीपणे राबविली. पाणी व स्वच्छता विभागात त्यांनी केलेल्या कामाची दखल म्हणून त्यांना पंढरपूरची अतिरिक्त जबाबदारी मिळाली होती. या जबाबदारीचे सोनं केल्यामुळे त्यांना पंढरपूर व्हिडिओची पोस्टिंग मिळाली आहे. जिल्हा परिषदेतील प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या नंतर जाधव यांना चांगली पोस्टिंग मिळाली आहे. आता प्रशासन विभागाकडे कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायत विभागाचे सूर्यकांत भुजबळ तर त्यांच्या ठिकाणी सांगलीहून बीडीओ बदलून येईल असे सांगितले जात आहे.

No comments:

Post a Comment