रुग्णांच्या हक्कांसाठी आमदार अभिजीत पाटील यांचा ठाम पाठपुरावा!
चळे प्रतिनिधी,,,सर्वसामान्य नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये, तसेच धर्मादाय योजनेचा लाभ पात्र रुग्णांपर्यंत पोहोचावा, यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यापासून ते धर्मादाय सहआयुक्तांकडे तक्रार करण्यापर्यंत सातत्याने पाठपुरावा केला.
विधानसभेत आवाज उठवून आणि प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा करून रुग्णांच्या हक्कांचा प्रश्न ऐरणीवर आणणाऱ्या आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अश्विनी पाटील यांच्या प्रकरणात दिलासादायक आदेश पारित झाला आहे. रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या पाठपुराव्याचे हे महत्त्वपूर्ण उदाहरण ठरले आहे.
No comments:
Post a Comment