पुणे पदवीधर मतदारसंघातून हर्षदा देशमुख विजयी
"वान्याची दिशा हर्षदा यांच्याच दिशेने आहे..."
- आमदार राजू खरे
चळे प्रतिनिधी,,पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकीत हर्षदा देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या या विजयामुळे राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, पंढरपूर येथे झालेल्या एका मेळाव्यात आमदार राजू खरे यांनी "वान्याची दिशाही हर्षदा यांच्याच दिशेने आहे," असा विश्वास व्यक्त केला होता. आज निकालांनंतर आमदार राजू खरेंचा हा शब्द अक्षरशः खरा ठरल्याचे स्प्ष्ट झाले आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान आणि पंढरपूर येथील मेळाव्यात बोलताना आमदार राजू खरे यांनी हर्षदा देशमुख यांच्या बाजूने अनुकूल वातावरण असल्याचे म्हटले होते. त्यांचे हे भाकीत निकालांनी तंतोतंत खरे ठरवून दाखवले आहे. या विजयामुळे हर्षदा देशमुख यांच्या समर्थकांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून पंढरपूरात आणि पुण्यात जोरदार सेलिब्रेशन सुरू आहे.
हर्षदा देशमुख यांच्या विजयाबद्दल आमदार राजू खरे यांनी व्यक केला होता विश्वास.
महाविकास आघाडीचा मोठा विजय !
हर्षदा देशमुख यांचा दणदणीत विजय
राजू खरे यांच्या भाकिताला मिळाली पुष्टी
समर्थकांमध्ये जल्लोष,
पंढरपूर
No comments:
Post a Comment