पशुधनाच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवा : आमदार समाधान आवताडे
आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीची पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून दखल; तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश


पंढरपूर (प्रतिनिधी) : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. जनावरांची संख्या आणि त्यांच्या प्रत्यक्ष पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रति जनावर पिण्याच्या पाण्याचे प्रमाण लिटरमध्ये वाढवावे, तसेच त्यानुसार टँकरची संख्या वाढवून पुरेसा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची दखल घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
About Chanakyatimesnews
No comments:
Post a Comment