*मोहोळचे आ. राजू खरे यांचा दणका!*  *महावितरणचे लांबोटीचे कनिष्ठ अभियंता ओंकार साठे यांचे निलंबन*  *शेतकऱ्यासाठी उठवला होता नागपूर अधिवेशनात आवाज*

 चळे प्रतिनिधी 

मोहोळ पंढरपूर उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार राजू खरे यांनी नुकत्याच झालेल्या नागपूर अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवला होता. यामध्ये लांबोटीचे महावितरणचे कनिष्ठ अभियंता ओंकार साठे यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची तात्काळ दखल घेत सोलापूर ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीषकुमार सूर्यवंशी यांनी साठे यांना निलंबित करण्यात आले असल्याचा लेखी आदेश काढण्यात आला आहे. या निलंबन आदेशाने मोहोळचे आमदार राजीव खरे यांचा दणका सुरू झाला असल्याची चर्चा चालू झाली आहे.  
 झालेल्या अतिवृष्टीने बळीराजा हवालदील झाला होता. अनेकांची उभी पिके पाण्यात वाहून गेली होती. अनेकांची जनावरे ही वाहून गेली होती. विजेचे खांब ही कुलमडले होते. अशा परिस्थितीत सरकारी बाबुनी म्हणजे तलाठी ग्रामसेवक यांचे कडून काही भागातील शेतकऱ्यांना मदत देताना  दुजाभाव करण्यात आला होता. याची दखल घेत आमदार राजू खरे यांनी थेट अधिवेशनामध्ये संबंधितावर कारवाई करण्याबाबतचा आवाज उठवला होता. याबरोबरच नवीन विजेचा डीपी बसवण्यासाठी चक्क २५ हजार रुपयाची मागणी कनिष्ठ अभियंता ओंकार  साठे यांच्याकडून करण्यात आली होती. असा आरोप आ. राजू खरे यांनी अधिवेशनात केला होता. त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी ही मागणी केली होती . या मागणीची दखल घेण्यात आली आहे.

वीज महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मनीष कुमार सूर्यवंशी यांनी काढलेल्या तातडीने काढलेल्या या निलंबन आदेशामध्ये 
आपण  ओंकार विष्णू साठे, कनिष्ठ अभियंता भनिनि क्र.२८५२२९२ शा.का लांबोटी, उपविभाग मोहोळ येथे कार्यरत आहात. सप्टेंबर व ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टि, पूर, वादळवाऱ्यामूळे शा. का लांबोटी अंर्तगत नदी काठच्या गावामध्ये विद्युत चाहिन्या, रोहित्रे, विद्युत खांब यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विद्युत पुरवठा पूर्वपदावर आणनेबाबत शासन व वरिष्ठ कार्यालयाव्दारे त्वरीत कार्यवाही करणेचे आदेश दिले होते. पूरपरिस्थीतीपश्चात आपले शाखा कार्यालयांतर्गत विद्युत यंत्रणा अद्यापर्यंत पुर्ववत झाली नसलेबाबत तसेच आपण स्वतः ग्राहकांकडून वितरण रोहित्रे उभा करण्यासाठी पैशाची मागणी करत असलेबाबत व जो पैसे देतो त्यांचाच डीपी बसविण्यात येतो .अशी मा.लोकप्रतिनिधीव्दारे तक्रार प्राप्त झाली आहे. परिणामी लोकक्षोभ निर्माण होऊन कंपनीची प्रतिमा जनमानसात मलिन झालेली आहे. सदर तक्रार विधानसभा तारांकित प्रश्नामध्ये मांडण्यात आली आहे.

उपरोक्त बाबी अतिशय गंभीर स्वरुपाच्या असून, कंपनीची परिपत्रके, नियम तसेच विनियमांचे उल्लंघन करणारे असून, कंपनीच्या आर्थिक नुकसानास जबाबदार व कंपनीची प्रतिमा जनमाणसात मलिन करणारी आहे. त्यावरुन आपण दोषी आहात हे प्रथमदर्शनी दिसून येते आहे. त्यामुळे आपली सद्याच्या पदावर सद्याच्या कार्यालयात सेवा चालू ठेवणे कंपनीच्या हिताच्या दृष्टीने नुकसानकारक आहे. सबब, म.रा.वि.वि.कं. मर्या, कर्मचारी सेवाविनियम २००५ मधील सेवाविनियम क्र.८८ (क) व अनुसूचि "ग" सह दुरुस्ती चिड्डी क्रमांक ४२ दि.०४,०५,२०१९ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार मी मनिषकुमार काशीनाथ सुर्यवंशी, कार्यकारी अभियंता तथा सक्षम अधिकारी, तुम्हांस दिनांक १२.१२.२०२५ च्या माध्यान्होत्तरपासून पुढील अंतिम आदेशाच्या अधीन राहून कंपनीच्या सेवेतून निलंबित करीत आहे.

निलंबन कालावधीत महावितरण सोलापूर ग्रामीण विभागांतर्गत अक्कलकोट-१ उपविभाग येथे कामकाजाच्या दिवशी प्रत्येक आठवड्याच्या सोमवार व गुरुवार सकाळी ११.०० वाजता हजेरी द्यावी. सदर दिवशी सुट्टी असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी हजेरी द्यावी, निलंबन कालावधीत सध्याचे मूळ वेतनाच्या ५०% रक्कम अधिक पूर्ण महागाई भत्ता, घरभाडे भत्ता निर्वाह भत्ता म्हणून मिळणेस पात्र असाल, सदर निर्वाह भत्ता म.रा.वि.वि.कं. मर्या., कर्मचारी सेवाविनियम-२००५ मधील ८८ (क) (३) मधील तरतूदीनुसार आपण निलंबन आदेशाचे पालन करता किंवा नाही यावर अवलंबून राहील, तसेच निलंबन कालावधीत निम्नस्वाक्षरीधारकांच्या पूर्व परवानगीशिवाय तुम्हांस मुख्यालय सोडता येणार नाही. असे सूचित केले आहे.