पंढरीत पालकमंत्री जयकुमार गोरेंना आत्मविश्वास मधला नगराध्यक्षपदी डॉ, प्रणिता भालके विजय - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Monday, 22 December 2025

पंढरीत पालकमंत्री जयकुमार गोरेंना आत्मविश्वास मधला नगराध्यक्षपदी डॉ, प्रणिता भालके विजय

पंढरीत पालकमंत्री जयकुमार गोरेंना आत्मविश्वास नडला

पंढरीत नगराध्यक्षपदी तिर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉ. प्रणिता भालके विजयी
 चळे प्रतिनिधी दि. २१ (प्रतिनिधी) पंढरपूर नगरपालिके च्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आत्मविश्वास नडला, भ्रमाचा भोपळा फुटला अशी चर्चा संपूर्ण पंढरपूर शहरात सुरू आहे. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके यांनी १११३६ मतांनी विजय मिळविला आहे. पंढरपूर नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष पदाची जागा सर्वसाधारण गटासाठी असतानाही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ओबीसी गटाच्या उमेदवार सौ शामल लक्ष्मण शिरसाठ यांना भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास सांगून विजय हा कमळाचाच होणार असल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला होता. मात्र तो त्यांचा भ्रमाचा भोपळा

फुटलेला आहे अशी चर्चा आज मतमोजणी केंद्र बाहेरील रेल्वे ग्राउंड परिसर तसेच संपूर्ण पंढरपूर शहरात सुरू होती.

पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व ३६ नगरसेवक पदांसाठी दिनांक २ डिसेंबर रोजी सरासरी ६५ टक्के मतदान झाले होते. पंढरपूर नगरपालिकेतील

प्रभाग क्रमांक ७ व मधील हरकतीवरील निर्णय अपिलात गेल्यामुळे दि. ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी आज दि. २१ डिसेंबर रोजी पार पडली. या मतमोजणीत स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर सौ. प्रणिता

भगीरथ भालके यांनी पहिल्या फेरी बसूनच घेतलेली आघाडी विरोधी माजी आमदार प्रशांत प्रचार गटाच्या भाजपच्या उमेदवार सौ. शामल लक्ष्मण शिरसाठ यांना तोडता आलेली नाही. तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर सौ प्रणिता भगीरथ भालके यांना ३४९६० तर विरोधी परिचारक गटाच्या व भाजपाच्या उमेदवार सौ शामल लक्ष्मण शिरसाठ यांना २३ ८२४ एवढी मते मिळाली आहे.

पंढरपूर नगरपालिकेच्या एकूण ३६ नगरसेवकांपैकी २४ नगरसेवक भाजपा व पंढरपूर मंगळवेडा शहर विकास आघाडीचे निवडून आलेले आहेत तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ११ उमेदवार निवडून आलेले आहेत. पत्रकार अभय जोशी यांचा मुलगा ड. ओंकार जोशी हा अपक्ष निवडून आलेला आहे.

No comments:

Post a Comment