नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग आरेखणात बदल करू नका! मोहोळचे आ. राजू खरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Wednesday, 24 December 2025

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग आरेखणात बदल करू नका! मोहोळचे आ. राजू खरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी

नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग आरेखणात बदल करू नका! मोहोळचे  आ. राजू खरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी

*नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग आरेखणात बदल करू नका*!  *मोहोळचे  आ. राजू खरे यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी मागणी*

 चळे,,प्रतिनिधी 

नागपूर गोवा शक्तीपीठ हा एकूण १२जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये सोलापूर हा अति दुष्काळी भागाचा समावेश होणार आहे.मात्र या महामार्ग आरेखणात बदल झाला असल्याचे  असल्याचे नुकतेच हिवाळी अधिवेशनात सांगितले गेले आहे.  तरी हा बदल न करता पूर्वी प्रमाणे करावा अशी मागणी मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर मतदार संघाचे आमदार राजू खरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री ना . एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.
    आ राजू खरे यांचे मतदार संघातील उत्तर सोलापूर, मोहोळ आणि पंढरपूर तालुक्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार होता. या भागातील सीमांकनाचे काम ही पूर्ण झाले होते. एवढेच नव्हे तर हद्दीच्या खुणांचे खांबही उभे करण्यात आले होते. वरील मतदारसंघातील मोजणीचे काम हे पूर्ण झाले होते. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये या शक्तीपीठ महामार्गात बदल झाल्याचे समजले असल्याने, आमच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याचे दिसून आले आहे. असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
  वरील मार्गात बदल करण्यात येत असल्याचे समजतात शेतकऱ्यांकडून आंदोलनाची तयारी केली जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी हा बदल करण्यात आलेला रद्द करावा आणि पूर्वापार पद्धतीने शक्तीपीठ महामार्ग करण्यात यावा अशी मागणी ही आमदार राजू खरे यांनी ना.एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
   माझ्या मतदार संघातील असलेल्या मोहोळ, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यातील आरेखनात कोणताही बदल न करता मूळ आरेखाना प्रमाणे कार्यवाही करून रस्ता बाधित शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी आमदार राजू खरे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment