ग्रामीण भागातील विकासाला गती देण्या साठी भाजपालाच सत्ता देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ही काळाची गरज असल्याचे प्रशांत परिचारक यांनी रांजणी येथील प्रचार सभेत व्यक्त केले
चळे प्रतिनिधी,, तालुका पंढरपूर रांझणी,येथील ग्रामदैवत शंभू महादेव मंदिरामध्ये पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद व 16 पंचायत समिती गणाच्या भाजपा उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ ज्येष्ठ नेते दिनकर मोरे यांच्या हस्ते फोडण्यात आला .
माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी जिल्हा परिषद व १६ पंचायत समितीच्चा उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात करण्यात आली यावेळी परिचारक,बोलत होते
यावेळी बोलताना परिचारक म्हणाले की पंढरपूर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद व 16 पंचायत समिती सदस्य हे भारतीय जनता पक्षाच्या निवडून द्यायचे आहेत भाजपा सत्तेच्या काळात 70कोटी शेतक-यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेच्या माध्यमातून लाभ दिला आहे, मुख्यमंत्री देवाभाऊंनी लाडक्या बहिणींना महिना १५०० लाभ मिळत आहे, आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री जयकुमार गोरे गोरे हे ग्रामविकास मंत्री असल्याकारणाने ग्रामीण भागातील विकास कामाकरिता निधीची कमतरता भासणार नाही, राज्यात महायुतीचे सरकार असल्याने आपल्यातील राष्ट्रवादी पक्षाचे कल्याणराव काळे गणेश पाटील यांना सोबत घेऊन तडजोडीचे राजकारण केले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील पांडुरंग परिवार व विठ्ठल परिवरातील यांना सोबत घेऊन भाजपा उमेदवाराचा प्रचार करावा लागेल कुठल्याही प्रकारचा दगा फटका खपवून घेणार नाही अशा सक्त सूचना प्रशांत परिचारक यांनी सर्व प्रमुख पदाधिकारी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते यांना दिल्या, आमदार समाधान आवताडे कल्याण काळे कल्याण पाटील युवराज पाटील हरीश गायकवाड पंडित भोसले समाधान काळे सुभाष माने मारुती भोसले यांची भाषणे झाली.
यावेळी यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण,वामनमाने,दिलीप घाडगे लक्ष्मण धनवडे प्रणव परिचारक कैलास खुळे राजू गावडे भारत कोळेकर, आदित्य देशमुख हर्षल कदम माऊली हळनवर सोमनाथ ढोणे, गणेश अंकुशराव त्याचप्रमाणे गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ दुर्गा गोपाळ अंकुशराव, पुळुज पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ ज्योती शिवाजी पांढरे, गोपापूर पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ रंजना अण्णासो शिंदे, सरकोली पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ अर्चना शशिकांत कराळे यांच्या सर्व जिल्हा परिषदेचे पंचायत समिती उमेदवार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment