विटे येथे आंबेडकर जयंती निमित्त आमदार राजू खरे यांच्या पत्नी तृप्ती खरे यांच्या हस्ते संसार उपयोगी साहित्य व शैक्षणिक साहित्य वाटप संपन्न
चळे प्रतिनिधी - विटे ता पंढरट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम जयंती सामाजीक उपक्रम घेऊन साजरी करण्यात आली . यावेळी यावेळी आमदार राजू खरे यांच्या पत्नीसो तृप्ती खरे यांच्या हस्ते स्पर्धकांना महिलांना विविध संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे संगीत खुर्ची खेळ पैठणीच्या या स्पर्धेमधील महिलांना पैठणीचे साडी बक्षीस देण्यात आले मुलीला स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद शाळेत शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले. यामध्ये दप्तर वहया पेन, समावेश होता, त्याचप्रमाण महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आला. .
यावेळी बोलताना सौ तृप्ती खरे कि डॉक्टर बाबासाहेब आंबडेकरानी दिन दुबळ्या मागासलेल्या समाजाला न्याय देयासाठी जनजागृती करण्याचे मोठे काम केले. संविधान लिहिल्यामुळे सामाजीक विषमता दरी कमी करण्याचे काम यामुळे होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मर्यादीत समाजाचे न राहता सर्व समाजाचे प्रतिक राहिले पाहिजे. दलित, मातंग समाजानेसुद्धा इतर महापुरुषांचे विचार आचरणात घेऊन सामानीक उपक्रम राबवले पहिजे. असे सौ तृप्ती खरे यावेळी म्हणाल्या.
या कार्यक्रमास पोलीस उपनिरक्षीक सचिन परकाळे, माजी उपसरपंच श्रावण परकाळे, अध्यक्ष पांडूरंग परकाळे, उप अध्यक्ष अक्षय परकाळे सचिव दत्ता परकाळे ग्रा.पं.सदस्य सदस्य ज्ञानू परकाळे, सामाजीक,कार्यकर्ते स्वाती सोनवणे, वैशाली परकाळे देव हरी परकाळे विजय परकाळे आधी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.
No comments:
Post a Comment