संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Sunday, 26 July 2026

संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंढरपूर, दि. २४: 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे वितरीत करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित सुधाकरपंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. कर्जमाफीची भव्य सुरुवात करण्याऐवजी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी, वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात, तिथून याची सुरुवात करावी या उद्देशाने आज येथून कर्जमाफीची सुरुवात करण्यात येत आहे. त्यानुसार सहकार विभागाने १७ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली असून १३ हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ तारखेपूर्वीच जमा करण्यात येणार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, उत्तमराव जानकर, नारायणराव पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन हरीश गायकवाड उपसभापती राजू गावडे यांच्या सर्व संचालक मंडळ पांडुरंग परिवार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत. कर्जमाफीची भव्य सुरुवात करण्याऐवजी पांडुरंगाच्या नगरीत जिथे शेतकरी, वारकरी इतक्या मोठ्या प्रमाणात येतात, तिथून याची सुरुवात करावी या उद्देशाने आज येथून कर्जमाफीची सुरुवात करण्यात येत आहे. त्यानुसार सहकार विभागाने १७ लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली असून १३ हजार कोटी रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ तारखेपूर्वीच जमा करण्यात येणार आहेत.






No comments:

Post a Comment