आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी छत्री वाटप; आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम - chanakyatimesnews

ब्रेकिंग न्यूज

Sunday, 26 July 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी छत्री वाटप; आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम

आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी छत्री वाटप; आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून सेवाभावी उपक्रम

पंढरपूर,- आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत. या काळात कडक ऊन आणि अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे वारकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून सेवाभाव जपत वारकरी, पोलीस बांधव, छोटे व्यावसायिक, दिव्यांग नागरिक, आरोग्य सेवक तसेच परिचारिका यांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामागील उद्देश केवळ छत्री वाटप नसून, वारीत विविध स्तरांवर सेवा बजावणाऱ्या प्रत्येक घटकाला ऊन आणि पावसापासून संरक्षण मिळावे हा होता. दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांसह बंदोबस्तावर तैनात असलेले पोलीस कर्मचारी, रस्त्यालगत व्यवसाय करणारे छोटे व्यावसायिक, दिव्यांग नागरिक तसेच आरोग्य यंत्रणेत कार्यरत डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.

डॉ. योगेश रणदिवे आणि शहराध्यक्ष दीपकदादा वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष अमरसिंह खांडेकर, आसिफ पटेल, दिनेश ममाने यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छत्र्यांचे वितरण केले. वारीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाचे वारकरी आणि नागरिकांकडून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे वारीतील सेवाभावाची परंपरा अधिक बळकट होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment