डॉ प्रणिता ताई भालके यांच्या रेकॉर्डब्रेक प्रचार शुभारंभा मुळे विरोधकांच्या ह्रदयाची धकधक वाढली
दोन दिवसा खाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये नामदेव पायरी परिसरामध्ये भाजपा या पक्षाने प्रचार फेरीचा शुभारंभ केला होता. त्याचप्रमाणे आज रोजी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीने डॉ. प्रणिता ताई भालके यांच्या प्रचार शुभारंभाचे सुरुवात आज रोजी नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी या प्रचार शुभारंभाला व प्रचार फेरीला रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी दिसून आली. सर्वसामान्य जनता आणि या मंदिर परिसरातील व्यापारी व रहिवाशी जे लोक कॅरीडोर बाधित होणार आहे . अशा बाधीताची गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात होती.
भाजपाने प्रचाराचा शुभारंभ पालकमंत्री जयकुमार यांच्या उपस्थितीमध्ये केला. त्या प्रचार शुभारंभाच्या प्रचार फेरीपेक्षा कितीतरी मोठी अशी प्रचार फेरी आज प्रणिता ताई भालके यांनी काढली.या रेकॉर्ड ब्रेक प्रचार फेरी ची चर्चा सध्या पंढरपूर शहरामध्ये सुरू आहे.
या प्रचार फेरीस उपस्थित भगिरथ भालके नागेश काका भोसले, शिवसेनेचे साईनाथ अभंगराव ,राष्ट्रवादीचे अनिल सावंत, काँग्रेसचे आदित्य फतेपुर कर ,धनंजय कोताळकर व तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार व असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
No comments:
Post a Comment